पंढरपूर: कोरोना महामारीमुळे प्रशासकीय यंत्रणेकडून प्रमाणपत्रे मिळण्यास झालेला विलंब पाहता अनेक जण अजून प्रवेश प्रक्रियेपासून वंचित आहेत. याचा विचार करून प्रथम वर्ष डी.फार्मसीसाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी शासनाने आणखी मुदत वाढ दिली आहे. ‘महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई म्हणजेच एम.एस.बी.टी.ई. मार्फत चालवल्या जाणाऱ्या बारावी सायन्स नंतरच्या डी.फार्मसी रजिस्ट्रेशनसाठी मुदत वाढवली असून दिनांक ४ सप्टेंबर २०२० अखेर पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. या अगोदर रजिस्ट्रेशन करण्याची मुदत २५ ऑगस्ट पर्यंतच होती परंतु त्यात आता मुदत वाढवून दिली आहे. विद्यार्थ्यांना दि.४ सप्टेंबर पर्यंत मुदत दिल्याने डी.फार्मसीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या मुदत वाढीमुळे आणखी संधी मिळाली आहे.’ अशी माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ फार्मसी (डी.फार्मसी ) पंढरपूरचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांनी दिली.
यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावर दिनांक ७ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.जर प्रवेश अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर दुरुस्ती दिनांक ८ ते १० सप्टेंबर या दरम्यान करता येईल. यानंतर १२ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना अंतिम गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावर पाहता येईल. दिनांक २५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पडताळणी करून रजिस्ट्रेशन करता येणार आहे. यंदाही स्वेरी कॉलेजला पालकांनी व विद्यार्थ्यांनी पहिली पसंती दिली आहे. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांच्या नेतृत्वाखाली सुविधा केंद्राचे कामकाज सुरु आहे. या अनुषंगाने सुविधा केंद्रावर पालकांची व विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी पहावयास मिळते आहे. या मुदतवाढीचा लाभ बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी तसेच अजून ज्यांना डी.फार्मसीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे परंतु अद्यापही ज्यांनी रजिस्ट्रेशन केले नाही त्यांना घेता येणार आहे. या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. डी.फार्मसी प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी मोबा.क्र. ९७६६१५९२९८ यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांनी केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डी. फार्मसीच्या फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
छायाचित्रः- स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे,स्वेरी चिन्ह व प्राचार्य प्रा. सतीश मांडवे

