👁 12 Views

‘स्वेरी ही एका किमयागाराने केलेली किमया आहे’ -रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.अशोक भोईटे

पंढरपूर: गोपाळपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात स्वेरी म्हणजे एका किमयागाराने केलेली किमयाच आहे. स्वेरीला  सावळ्या विठ्ठलाचा आशीर्वाद लाभलेला आहे. अवघड असलेले काम सोपे करणे, सोपे असलेले काम सहज करणे, सहज असलेले काम सुंदर करणे आणि सुंदर असलेले कार्य जतन करणे  हे आपले कर्तव्य असले पाहिजे. म्हणजे चांगल्याचं बोचकं  बांधा आणि वाईट असलेले सोडून द्या. याच प्रमाणे स्वेरीच्या  डॉ. रोंगे सरांचे कार्य  असून रोंगे सर हे सर्व स्तरातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी महान कार्य करत आहेत.’ असे प्रतिपादन पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयाचे सेवा निवृत्त प्राचार्य डॉ.अशोक भुईटे यांनी केले.


प्रारंभी सेवानिवृत्तीच्या निमित्ताने स्वेरीचे संस्थापक सचिव आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या हस्ते डॉ.भुईटे यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाच्या प्रास्ताविकात सचिव आणि प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी डॉ. भुईटे यांच्या यशस्वी कारकीर्दीवर प्रकाश टाकुन त्यांच्या कार्याचा गौरवोदगार काढताना म्हणाले की, ‘डॉ.भुईटे यांच्या उच्च कार्याची दखल घेऊनच त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. पुढे त्यांनी केबीपी महाविद्यालय, पंढरपूरचे प्राचार्य म्हणून यशस्वीपणे कार्यभार पाहिला व अलीकडेच ते सेवानिवृत्त झाले.’  याप्रसंगी प्राचार्य डॉ. भुईटे यांनी आपल्या सेवा काळातील कार्याची आणि मिळवलेल्या यशाची माहिती दिली. ते पुढे म्हणाले ‘आपली भूमिका चांगली असेल, प्रामाणिक असेल तर सर्व बाजूने आणि सर्वांकडून सहकार्य मिळते आणि यश प्राप्त होते. आपण काम करताना माझं काम म्हणून आपण जे काम करतो त्याचे सहसा ओझं वाटत नाही. 

आपण सकारात्मक काम केले पाहिजे. मी स्वेरी बद्दल फार पूर्वीपासून ऐकत आलोय. माझ्याकडे आलेल्या अनेक पालकांनी स्वेरीच्या कार्याचे मनापासून कौतुक केलेले आहे. त्यातील एका पालकांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘स्वेरीमध्ये शिक्षण घेवून त्यांच्या दोन्ही मुली  मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. आज माझ्या मुली यशस्वी होऊ शकल्या ते केवळ स्वेरीतील शिक्षण संस्कृतीमुळे शक्य झाले.’ यावेळी माजी विद्यार्थी निखिल बागल, स्वेरी अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता आणि प्राध्यापक वर्ग या समारंभात उपस्थित होते. प्रा.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

पंढरपूर लाईव्ह या लोकप्रिय ई-न्युज वेब पोर्टल आणि यु-ट्युब चॅनलवर जाहिराती व बातम्या प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधा. मोबा. 8149624977

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *