👁 9 Views

थोडक्यात पण महत्वाचे… पंढरीतील नामवंत वाघ सर यांच्या युनिक क्लासेसचे उज्जवल यश!

पंढरपूरमधील वाघ सर यांच्या सुप्रसिध्द ‘युनिक क्लासेसच्या’ विद्यार्थ्यांनी 12 वी विज्ञान शाखेतुन NEET/JEE/CET  या परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळविले आहे. गेली 7 वर्षे या क्लासचा रिझल्ट विक्रमी आहे. अतिशय कमी कालावधीत हा क्लास नावारुपास आला आहे. 

कोरोनाच्या संकटकाळात क्लासकडून कोणत्याही विद्यार्थ्यांना फी साठी तगादा लावलेला नाही. स्वखर्चाने ऑनलाईन क्लासेससाठी अद्ययावत असे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल अ‍ॅप्लीकेशन तयार करुन अविरतपणे विद्यार्थ्यांना याद्वारे ऑनलाईन अभ्यासक्रमाचे शिक्षण सुरु ठेवले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची योग्य ती खबरदारी क्लासेसने घेतली आहे. 

आत्तापर्यंत क्लासमधुन एक हजार पेक्षा जास्त इंजिनिअर्स, पाचशे पेक्षा जास्त डॉक्टर्स व इतर विविध क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थी घडविले आहेत.  पंढरीतील लिंक रोड वर, देशमुख पेट्रोल पंपामागे, शिवयोगी मंगल भवन मध्ये युनिक क्लासेस विद्यार्थ्यांचे उज्जवल करीअर घडविण्यासाठी सर्वसोयींनियुक्त सुसज्ज आहे.  यशस्वी विद्यार्थी घडविण्यासाठी युनिक  क्लासेसमधील प्रा. विवेक पवार सर,  प्रा. अनिल पवार सर, प्रा.साळुंखे सर,  प्रा.कांबळे सर,  प्रा.चौगुले सर हे अथक परिश्रम घेत आहेत.  

क्लासच्या माध्यमातुन सामाजिक कार्यही मोठ्या प्रमाणात केले जाते. गरीब व होतकरु अशा बर्‍याच विद्यार्थ्यांना या क्लासने विनामुल्य शिक्षण देवुन आपली सामाजिक जबाबदारी सांभाळली आहे. एकुणच विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येय प्राप्तीसाठी योग्य ते मार्गदर्शन आणि अत्याधूनिक यंत्रणेचा, साधनांचा अवलंब करुन दर्जेदार शिक्षण दिले जाते. अशी माहिती युनिक क्लासेसचे प्रा. यशवंत वाघ सर यांनी दिली. युनिक क्लासेसच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!


पंढरपूर लाईव्ह या लोकप्रिय ई-न्युज वेब पोर्टल आणि यु-ट्युब चॅनलवर जाहिराती व बातम्या प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधा. मोबा. 8149624977

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *