पंढरपूर: प्रतिनिधी
एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील अणुविद्युत व दूरसंचार विभागात ऑनलाईन पद्धतीने “मशीन लर्निंग” या विषयावर ऑनलाईन वेबिनार संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात लाॅकडाऊन कालावधीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध ऑनलाईन कोर्सेस व ऑनलाईन वेबिनार आयोजन करून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्राधान्य देण्यात आले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देतात समाजाभिमुख शिक्षण देण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने नेहमीच नवनवीन तंत्रज्ञान विषयी माहिती विद्यार्थ्यांना लाॅकडाऊन कालावधीत ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून देत आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
या वेबिनारच्या सुरवातीला प्रा. प्रियांका बनकर यांनी वेबिनारच्या मार्गदर्शक प्रा. तृप्ती बनसोडे यांचा परिचय करून देऊन स्वागत केले. अणुविद्युत व दूरसंचार विभाग प्रमुख प्रा. सुधा सुरवसे यांनी यादरम्यान मनोगत व्यक्त केले.
हे वेबिनार यशस्वी करण्यासाठी अणुविद्युत व दूरसंचार विभागातील प्रा. प्रियांका बनकर यांच्या सह विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
पंढरपूर: प्रतिनिधी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाच्या वतीने मेकॅनिकल इंजिनिअरींग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात शेवटच्या वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी “एनर्जी काॅन्सरवेशन अँड ऑडिट” या विषयावर प्रा. एम. एम. वाघ यांचे ऑनलाईन वेबिनार संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने दि. ९ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता या वेबिनारची सुरवात करण्यात आली. या वेबिनारच्या सुरवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी प्रा. एम. एम. वाघ यांचे स्वागत केले.
महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन वेबिनार मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. वाघ म्हणाले, सद्या उर्जा स्ञोञाची खुप मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे. सुर्यापासुन मिळणा-या सौर उर्जेचे वापर आपण विविध ठिकाणी केला पाहिजे. फँकल्टी पेट्रोलियम, काॅन्सरवेशन रिसर्च, ऑर्गनायजेशन, गव्हरमेन्ट ऑफ इंडिया यांनी विविध उर्जा वापरासबंधीत वापरावर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. विद्युत उर्जेवर जास्त काळ अवलंबून न राहता इतर उर्जा स्ञोञांचा कुशल रीतीने वापर वाढविण्यासाठी शासन भर देत असुन भविष्यात जास्तीत-जास्त सुर्यापासुन मिळणा-या सौर उर्जेचे वापर लक्षात घेऊ तो प्रत्यक्ष वापरात आणण्याची काळाची गरज आहे. याशिवाय ऊर्जा बचतीची गरज व ऊर्जा क्षेत्रातील करीअरचा संधी याविषयी अतिशय महत्वपूर्ण ऑनलाईन सहभागी विद्यार्थ्यांना प्रा. वाघ यांनी केले.
महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. श्रीनिवास गंजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले होते. हे वेबिनार यशस्वी करण्यासाठी प्रा. धनंजय गिराम, प्रा. समाधान माळी, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा. अनिल जाधव यांनी परिश्रम घेतले.
पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी संपर्क
संपादक- भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977
(पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)



