गरीब, शोषित, वंचित समाजासाठी लढणारे नेते म्हणून ओळखले जाणारे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी सुनील गोरे यांची निवड करण्यात आली आहे.
सुनील गोरे हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत आहेत. राष्ट्रभक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आजतागायत अनेक गरजुंना आवश्यक तो आधार दिलाय, बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळवुन दिलंय त्यांच्या आजपर्यंत च्या समाजकार्याचा विचार करून प्रहार जनशक्ती पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लुभाऊ जवंजाळ व पक्ष प्रवक्ते अजय महाराज बारस्कर यांच्या सुचनेनुसार पुणे जिल्हा संघटक नीरज कडू यांनी सुनील सुरेश गोरे यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती केली.
पक्ष बळकटीसाठी व मजबुतीकरणासाठी तसेच नामदार बच्चूभाऊ कडू यांची व पक्षाची ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण कार्यरत राहु आणि वरिष्ठांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवु असे मत यावेळी नुतन शहराध्यक्ष सुनील गोरे यांनी व्यक्त केले.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी संपर्क संपादक- भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977 (पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)
पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी संपर्क
संपादक- भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977
(पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)



