👁 7 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ऊर्जा वापरासाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन


○ भारत स्वयंभू होण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार सौर ऊर्जेचे वेबिनार

पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात “एनर्जी स्वराज फाऊंडेशन व पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय” यांच्या संयुक्त विद्यमानाने २ ऑक्टोबर २०२० रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून “सामुहिक सौर ऊर्जा” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
   पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात मागिल वर्षी पासुन एनर्जी स्वराज फाऊंडेशन यांचा सामुहिक सौर ऊर्जा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमाअतंर्गत महात्मा गांधी ग्लोबल सोलर याञा अंतर्गत ५० विद्यार्थ्यांना सौर दिवे तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
   देशातील ऊर्जेचा वाढता वापर लक्षात घेता भविष्यात सुर्यापासुन मिळणा-या सौर उर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात व्हावा. सौर ऊर्जेवर चालणारे विविध उपकरणे बाजारात यावीत. यातून सौर उर्जेचा वापर वाढविण्यासाठी मदत व्हावी, विविध उपकरणे बाजारात विक्रीसाठी येण्यासाठी ती तयार करण्याची क्षमता तयार व्हावी यासाठी हा उपक्रम पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात राबविण्यात येत आहे.
     भारत सौर उर्जेच्या बाबतीत स्वयंभू होण्यासाठी या उपक्रमाची आवश्यकता आहे. महात्मा गांधी यांच्या “ग्रामीण विकास” या विचारामध्ये अपारंपारिक ऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर हा विचार करून २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सहभागी होण्यासाठी १५ सप्टेंबर पर्यंत नाव नोंदणी करता येणार असुन यासाठी नोंदणी शुल्क ५० रूपये भरणे आवश्यक आहे. नाव नोंदणी साठी https://energyswaraj.org/ssa_2020.php?organization_id=organization_421#registration_from_individual या लिंकचा वापर करावा असे आवाहन डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले असुन या उपक्रमाअतंर्गत १४ वर्षी वरील विद्यार्थ्यांनाच नाव नोंदणी करता येणार आहे. या उपक्रमाची संपुर्ण माहिती ही इंग्रजी भाषेतुन देण्यात येणार आहे.

   नोंदणी शुल्क भरल्यानंतर या वेबिनार मध्ये सहभागी होता येणार आहे. या मध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्ञज्ञ डाॅ. अनिल काकोडकर, पवई येथील आयआयटी चे शास्ञज्ञ प्रा. चेतन सोळंकी सह अनेक नामांकित शास्ञज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन या स्पर्धेत विजयी स्पर्धेकांना बक्षीस देण्यात येणार आहेत. हे वेबिनार नोंदणी करून यशस्वीरित्या पुर्ण केल्यानंतर ई-सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. या वेबिनारचा लाभ विद्यार्थ्यांना घ्यावा असे आवाहन “एनर्जी स्वराज फाऊंडेशन” च्या वतीने करण्यात आले आहे. या संदर्भात काही अडचण निर्माण झाल्यास डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांच्या ७८७५२१२८३५ या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी संपर्क संपादक- भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977 (पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)

पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी संपर्क संपादक- भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977 (पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)

पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी संपर्क
संपादक- भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977
(पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *