👁 9 Views

मराठवाड्यातील बळीराजाला दिलासा… राज्य शासन जाहीर करणार ओला दुष्काळ!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन 

सातत्याने  कोरड्या दुष्काळाच्या झळा सोसणा-या  मराठवाड्यातील बळीराजाला यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस  झाल्याने ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टीमुळे व पुरामुळे लाखो हेक्टर पिकांचेही नुकसान झालंय. त्यामुळे नुकसानाचा आढावा घेऊन सरकार लवकरच मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातला निर्णय घेईल असे कृषी मंत्री दादा भुसे यांनी लातूरमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलंय.

अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे नुकसान झालेल्या मराठवाड्याचा दोन दिवसीय दौरा राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केला. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी लातूर, नांदेड आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांचा धावता दौरा केला.  

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
   यावेळी ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊनही त्यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. तसेच या दौऱ्यात त्यांनी हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद येथील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावाही घेतला.

पंचनामे करून राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करेलच पण विमा कंपन्यांनाही मदती संदर्भात निर्देश दिले आहेत. तसेच राज्याचा परिस्थतीची माहिती केंद्र सरकारलाही देण्यात आली असून केंद्र सरकारलाही मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याची विनंती केली जाणार असल्याचे दादा भुसे यांनी यावेळी स्पष्ट केलं. बऱ्याच शेतकरी बांधवांचे नुकसान झालं आहे. नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. आणि त्याचा गोषवारा मंत्रिमंडळापुढे ठेवला जाईल. येणाऱ्या काळात मदतही शेतकऱ्यांना केली जाईल. विमा कंपन्यांना मदतीचे निर्देश दिले आहेत. केंद्र शासनाकडेही मदतीसाठी अहवाल पाठवला जाईल विनंती केली जाईल. आताच्या घडीला नेमकं किती नुकसान झालं याची माहिती घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकार निर्णय करेल असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी 

संपर्क, मुख्य संपादक-  भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977 
(पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *