👁 7 Views

स्वेरी अभियांत्रिकी तर्फे बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी येत्या गुरुवारी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन

स्वेरीचे डॉ. बी.पी. रोंगे सर करणार बहुमोल मार्गदर्शन

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग तर्फे बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी येत्या गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर २०२०) सायंकाळी ६.३० वाजता स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सरांचे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे.’ अशी माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी यांनी दिली.         


 

            सध्या महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी-सीईटी परीक्षा सुरु आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (कॅप राऊंडस्) सुरु होण्याची शक्यता आहे. याकरिता बारावी सायन्स शाखेमधून उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील भवितव्याचा विचार करून या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे. हे करिअर मार्गदर्शन सत्र येत्या गुरुवारी (दि. २२ आक्टोंबर २०२०) सायंकाळी ६.३० वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून www.facebook.com/svericampus/live/ या लिंकवरून होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थी व पालकांच्या मनात प्रवेशासंबंधी  विविध प्रश्न असण्याची  शक्यता नाकारता येत नाही. यासाठी विद्यार्थी व पालकांच्या मनातील संभ्रम व अडचणी लक्षात घेवून व्यावसायिक शिक्षणातील प्रदीर्घ अनुभव असणारे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सरांचे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (कॅप राऊंडस्)विविध शाखांची निवडप्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे आदी बाबत सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन व्हावे या दृष्टीने विद्यार्थी व पालकांसाठी या खास मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले असून विद्यार्थी व पालकांनी याचा याचा लाभ घ्यावा. तसेच  या संबंधी अधिक माहितीसाठी प्रा. उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) यांना संपर्क साधण्याचे आवाहन प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी यांनी केले आहे.

 छायाचित्रः- स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगेस्वेरी चिन्ह व प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *