👁 12 Views

भयानक… स्वतःचा गळा चिरून त्याने महादेवाच्या पिंडीला घातला रक्ताभिषेक!


Pandharpur Live Online- पैठणमध्ये अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या नंदू घुंगासे या २५ वर्षीय युवकाने भयानक कृत्य केल्याने खळबळ उडालीय.


महादेव प्रसन्न होईल या वेड्या धारणेने स्वतः चा गळा चिरून महादेवाच्या पिंडीला रक्ताने अभिषेक घालत जीवन संपविल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे. 


पैठण शहरातील गंगेश्वर महादेव मंदिरात स्वतःचा गळा चिरून कहारवाडा येथील नंदू घुंगासे या युवकाने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.


नंदुची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची. त्यातच वडीलांचे काही वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी आली. नंदुचा मोठा भाऊ बेफिकिर वृत्तीने वागत असल्याने नंदुवरच सर्व भार पडला. भावानेही कामधंदा करावा, असे त्याला वाटत होते.

मोठ्या भावाला पुणे जिल्ह्यातील एका ठिकाणच्या महादेवाच्या दर्शनास नेल्यास भाऊ चांगला होईल, असे कोणीतरी सुचविले. त्याप्रमाणे त्याला दर्शनाला नेऊन आणले. त्यानंतर भावाच्या वागणुकीत फरक पडल्याचे जाणवले, महादेव आपल्या जीवनात काहीही करू शकतात ही अंधश्रद्धा नंदुच्या मनात दृढ झाली. त्यातून हे कृत्य केल्याचे पाेलिसांनी सांगितले.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *