सिंहगड महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षणात अल्पावधितच नावलौकिक संपादित करून अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ता, जगातील नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांना नोक-या देऊन पंढरपुर सिंहगड महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षणात तसेच प्लेसमेंट मध्ये दमदार वाटचाल करून सोलापुर जिल्ह्यात नंबर १ स्थान पटकाविले असल्यामुळे पालक वर्गातून पंढरपुर सिंहगडचे कौतुक होत आहे.
अमेरिकेतील “वेबशार” या कंपनीत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील कुमारी नुतन व्यवहारे या विद्यार्थिनीला कंपनीत कडून वार्षिक ४ लाख रूपये पगार मिळणार आहे.
“वेबशार” एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेन्ट कन्सल्टन्सी आहे. जी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वेगवान विकासाची रणनीती वापरुन ग्राहकांच्या कार्यसंघासह त्यांच्या नवीन कल्पनांना जीवनात आणण्यासाठी भागीदारी करते. मशीनशिक्षण आणि डेटा विज्ञान, नैसर्गिक भाषा प्रक्रिया, क्लाऊड संगणन, इंटरनेट सुरक्षा अशा क्षेत्रांमध्ये वेबशारकडे अत्याधुनिक तांत्रिक कौशल्य आणि विस्तृत ज्ञान आहे. क्लायंटसह कार्य करत असताना, एक चांगला सांस्कृतिक आणि कार्यक्षम वातावरण प्रदान करण्यासाठी आणि वैयक्तिक वाढीस मदत करण्यासाठी वेबशर पोसते. अशा या “वेबशार” या अमेरिकन कंपनीत निवड झालेल्या कुमारी नुतन व्यवहारे या विद्यार्थिनींचे पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्युटचे प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. जयप्रकाश पिंताबरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, प्रा. नामदेव सावंत, प्रा. सुर्यकांत पाटील, राजाराम राऊत सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.