👁 11 Views

शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे नवे विश्वस्त मंडळ जाहीर

Pandharpur Live Online- शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टची 11 सदस्यांची यादी धर्मदाय आयुक्त कार्यालयातून जाहीर करण्यात आली. सदस्यत्वासाठी सुमारे 84 जणांनी अर्ज भरले होते. दि.21, 22, 23 डिसेंबर रोजी अहमदनगर येथील सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयात मुलाखती होऊन त्यातून 11 सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

…………….

 

Advet.  


……………

सन 2021 ते 2026 करीता शिवाजी आण्णासाहेब दरंदले, दिपक दादासाहेब दरंदले, शहाराम रावसाहेब दरंदले, विकास नानासाहेब बानकर, भागवत सोपान बानकर, अप्पासाहेब ज्ञानदेव शेटे, पोपट रामचंद्र शेटे, बाळासाहेब बन्सी बोरुडे, पोपट लक्ष्मण कुऱ्हाट, छबुराव नामदेव भुतकर, सुनिता विठ्ठल आढाव या 11 विश्वस्तांची निवड जाहीर केली आहे.


विद्यमान सदस्यांचा कार्यकाल पाच जानेवारीला संपणार असून त्यानंतर सदर नवीन सदस्यांचा कार्यकाल सुरु होईल. आता सर्वांचे लक्ष अध्यक्ष निवडीकडे लागले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *