यावेळी आमदार रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह, नगर विकास विभागाचे उपसचिव तथा समन्वय अधिकारी अनिरुध्द जेवळीकर सार्वजनिक बांधकामचे अधिक्षक अभियंता संजय माळी, प्रांताधिकारी सचिन इथापे, अमित माळी, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, अक्षय महाराज भोसले राणा महाराज वासकर, रामकृष्ण वीर महाराज तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा स्वागत विसावा मंदिर येथे श्री नामदेव महाराजांचा पालखी सोहळ्याकडून करण्यात येते.या स्वागत सोहळ्याला जागा उपलब्ध करून द्यावी. पालखीसोहळ्या बरोबर येणाऱ्या दिंड्यांच्या ट्रकची उंची जास्त असल्याने रेल्वे रुळाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या ओव्हर हेड करिअर मुळे वाहने शहरात येणार नाहीत. पंढरपूर शहरात अनेक दिंडी सोहळ्यांचे मठ असल्याने त्यांना आत ट्रक आणण्यास अडचणी निर्माण होतात या बाबत नियोजन करावे अशी मागणी राणा महाराज वासकर यांनी यावेळी केली.