👁 11 Views

वाखरीत भीषण अपघात… भरधाव वेगातील बसने घेतला एकाचा बळी

Pandharpur Live: पंढरपूर-पुणे मार्गावर वाखरी (ता.पंढरपूर) येथे आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पंढरपूरकडून भरधाव वेगात आलेल्या बसने एका ग्रामस्थास पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.



याबाबत समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार राजु माने (वय 52) रा. वाखरी हे आज सकाळी 8 वाजणेच्या सुमारास या मार्गावरून जात होते. दरम्यान पंढरपूर च्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या विठाई बस (MH 13, 5992) ने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. धडक देऊन बस तशीच भरधाव वेगात निघून गेली. या अपघातात राजु माने या ग्रामस्थाचा बळी गेला. 

सदर बसचा नंबर काही ग्रामस्थांनी लिहून घेतला असुन पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *