👁 11 Views

माझ्या बाळाला मला एकदा पाहू द्या हो! मातेचा हृद्य पिळवटून टाकणारा हंबरडा… नातेवाईकांचा आक्रोश!

 Pandharpur Live Online : भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात शिशु केअरला लागलेल्या आगीत होरपळून 10 चिमूकल्या बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने महाराष्ट्र हादरला… सर्वत्र या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. मध्यरात्री 2 वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. परंतु यावेळी आगीत होरपळीन मृृत्यूमुखी पडलेल्या बालकांना त्यांच्या मातांना पाहु दिले नाही… त्यामुळे यावेळी दु:खाचा डोंगर कोसळलेल्या एका मातेने माझ्या बाळाला मला एकदा तरी पाहु द्या की हो! असं म्हणत हंबरडा फोडला. हृद्य पिळवटून टाकणारे हे दृश्य पाहुन उपस्थितांचे डोळेही पाणावलेले आढळले.

भंडारा इथं सरकारी रुग्णालयात मध्यरात्री अग्नितांडव झालं. भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 बाळांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. शुक्रवारी मध्यरात्री 2च्या सुमारास ही आग लागली. या आगीतून 7 बाळांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला आहे.

जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाबाहेरच बाळांच्या आई आणि नातेवाईक आक्रोश करत असल्याचे अत्यंत दु:खद चित्र भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात पाहायला मिळत आहे. सकाळी बाळाची आईने माझ्या बाळाला एकदा मला पाहू द्या, अशी आर्त हाक रुग्णालय प्रशासनाला घातली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाबाहेरच या नातेवाईकांनी आपला हंबरडा फोडला आहे. पण अद्याप त्यांना आपल्या बाळांना पाहता आलेले नाही.

भंडारा जिल्हा रुग्णालयात मध्यरात्री लागलेल्या आगीत १० नवजात बालकांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 7 बाळांना वाचवण्यात यश आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत्यू झालेल्या लहान बाळांमध्ये एखादं बाळ अवघ्या 5 दिवसांचं आहे, तर एखादं 15 दिवसाचं.

या सर्व बाळांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्यामुळे बाळाच्या आईला फक्त दूध पाजण्यापूरतंच अतिदक्षता विभागात प्रवेश दिला जात होता. त्यामुळे दिवसभरात फक्त काही तासांसाठी ही बाळं आपल्या आईच्या कुशीत विसावत होती. पण शुक्रवारी मध्यरात्री काळाने घाला घातला आणि लागलेल्या आगीत 10 बाळांचा जीव गेला. दरम्यान, या घटनेमुळे राज्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. याशिवाय, याबाबत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.

भंडारा रुग्णालय जळीत प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार – राजेश टोपे

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणातील बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. 

बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

भंडारा जिल्हा रुग्णालयाला आज दुपारी भेट दिल्यानंतर टोपे बोलत होते. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यावेळी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयातील घटनास्थळाची पाहणी करताना त्यांनी आगीचे नेमके कारण, रुग्णालयाचे फायर एक्स्टींग्विश आणि इतरही सुरक्षात्मक बाबींचे ऑडिट अशा सर्व बाबींची ही समिती चौकशी करेल.या समितीत संबंधित विषयांचे तज्ञ समाविष्ट करण्यात आले आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *