👁 15 Views

महाराष्ट्र हादरला… 24 वर्षीय तरूणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार

Pandharpur Live Online: पुरोगामी महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना वाढत असल्याची टीका होत असतानाच महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आणखी एक बलात्काराची निंदनीय घटना घडली आहे.


चालत्या खासगी बस ट्रॅव्हल्समध्ये विनयभंग करून वाशिमच्या मालेगाव परिसरात बलात्कार केल्याची घटना घडलीय.

संबंधित तरुणीवरील बलात्काराची घटना 6 जानेवारीला घडलीय. या घटनेनंतर तरुणीचं मानसिक स्वास्थ खचलं होतं. पीडित तरुणीने पुण्यात पोहोचताच पोलिसांत तक्रार दिल्याने घडलेला सारा प्रकार समोर आला आहे.

आरोपीने पीडित तरुणीला सीट नंबर तुमची नसल्याचं कारण सांगून मागच्या सीटवर बसवले आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. तसंच घडलेल्या घटनेची वाच्यता केल्यास चालत्या गाडीतून फेकून देण्याची धमकी आरोपीने दिली.

दरम्यान, पुणे पोलिसांनी वाशिम पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला असून पोलिसांनी घडलेल्या घटनेमधील गुडविल्स कंपनीची ट्रॅव्हल्स जप्त केली असून संबंधित आरोपी समीर देवकर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान घटनेचा तपास मालेगाव पोलीस करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *