👁 11 Views

बूथवर लसीकरण कसं होणार? लस घेण्यासाठी कराव लागेल ऑनलाईन बुकिंग

पुणे ( विवेक गोसावी):  सरकारने ऑर्डर दिलेल्या कोव्हिशिल्ड लसीच्या एका डोसची किंमत 200 रुपये इतकी आहे. ही जगातील सर्वात किफायतशीर लस असल्याचे म्हटले जात आहे. जगातील अनेक देशांनी फायझर कंपनीच्या कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. परंतु या लसीच्या एका डोसची किंमत 1450 रुपये इतकी आहे. तर मॉर्डनाच्या कोरोनावरील लसीच्या एका डोसची किंमत तब्बल 2700 रुपये इतकी आहे.


कोरोनाची लस घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागणार आहे. या बुकिंगनंतर तुम्हाला तुमच्या घराजवळचा बूथ दिला जाईल. यासाठी सरकारतर्फे लसीकरण अभियान सुरु केलं जाईल. यामध्ये दर 2 किलोमीटरच्या अंतरावर लसीकरणं बूथ उभारले जातील. बुकिंग केल्यानंतर तुम्हाला लसीकरणाची वेळ आणि बूथचा पत्ता SMS केला जाईल. यानुसार तुम्ही लसीकरण बूथवर जाऊन लस घेऊ शकता.

लसीकरण बूथवर 3 खोल्या असणार आहेत, पहिल्या खोलीत तुमची सगळी कागदपत्र तपासली जातील. ज्यामध्ये तुमचं ओळखपत्र आणि इतर कागदपत्र असतील. एकाच व्यक्तीनं दोनदा लस घेऊ नये, आणि प्रत्येक व्यक्तीची नोंद करता यावी यासाठी ही नोंदणी असेल. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या खोलीत तुम्हाला लस दिली जाईल. लस दिल्यानंतर तुम्हाला देखरेखीखाली ठेवलं जाईल. जिथं तुमच्यावर 30 मिनिटांपर्यंत लक्ष ठेवलं जाईल. लसीचा काही साईड इफेक्ट झालाच तर तातडीनं वैद्यकीय उपचार दिले जातील, नाहीतर तुम्हाला घरी सोडण्यात येईल. पहिल्या लसीनंतर पुन्हा 28 दिवसांनी दुसरी लस घेण्यासाठी यावं लागणार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *