Pandharpur Live : कोरोनामुक्त पंढरपूर अभियानासाठी व आरोग्य विषयक जनजागृती साठी सहज हातातुन नेता येणारा आहुजा या नामवंत कंपनीचा स्पिकर दुसऱ्या वेळी नगरसेवक विवेक परदेशी यांनी खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक यांचे शुभ हस्ते , आरोग्य सभापती विक्रम शिरसट, यश नागेश भोसले, डॉ एकनाथ बोधले यांचे उपस्थितीत पंढरपूर नगरपरिषदेस भेट दिला. डिसेंबर महीन्यामध्ये कोरोमुक्त पंढरपूर अभियानासाठी शपथ घेण्यात आली होती. सदर अभियानासाठी श्री परदेशी यांनी सहज हातातून नेता येणारा स्पिकर सेट भेट दिला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढते कोव्हीडचे रुग्ण व वाढते कंटेंनमेंट झोन पाहता आजुन जास्त जोमाने जनजागृती करणे आवश्यक आहे. नागरी हिवताप अधिकारी श्री किरण मंजुळ यांनी अजून एक पोर्टेबल स्पिकर सेट ची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगितले. नगरसेवक विवेक परदेशी यांनी सदर स्पिकर सेट तातडीने उपलब्ध करुन दिला. या दुसऱ्या लाटेच्या प्रसंगी पंढरपूरातील दानशुर व्यक्ती विविध माध्यमातून समाज सेवा करत असल्याने समाधान वाटत असल्याचे श्री परदेशी यांनी सांगितले.
या कार्यक्रमास उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर,आरोग्य सभापती विक्रम शिरसट,अधिकारी किरण मंजुळ, यश नागेश भोसले, धर्मराज घोडके, सौदागर डोपे, पांडुरंग डोके, वैभव डोके, राहुल लिंगे, बापु डोपे, मिलींद येळे, प्रितम कुलकर्णी, आनंद कासट,विकी राउळ,आनंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.


