👁 3 Views

महर्षि वाल्मीकी संघ (रजि.) राज्य – महाराष्ट्र संघटनेकडून पंढरपूर तालुक्याच्या ‘या’ गावातील भ्रष्ट कारभाराच्या चौकशीची मागणी

 

Pandharpur live news : दिनांक :- २६.०५.२०२३ रोजी पंढरपूर आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीचे आणि सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे चाललेल्या आढावा बैठकिचे औचित्य साधत ” महर्षि वाल्मीकी संघ (रजि.)” राज्य-महाराष्ट्र आणि ” आदिम बहुउद्देशीय संस्था (रजि.) यांच्या दोन्ही संस्थेच्या सहकार्याने सोलापूर जिल्ह्यात ” अनुसूचित जमातीच्या ” कोळी महादेव, टोकरे कोळी ढोर कोळी, मल्हार कोळी, कोलचा, कोलघा या जमात बांधवांना येणाऱ्या अडचणी खालील मागण्या पूर्ण करून सोडविण्याची मागणी केली. 

प्रमुख मागण्या : 

 पंढरपूर तालुक्यातील काही ग्रामपंचायती दिव्यांग निधी देण्यास टाळाटाळ करीत असून त्यांचेवर कारवाई करण्यात यावी. 

गुरसाळे ग्रामपंचायतीचे महिला सरपंच सौ. कोळेकर, महिला उपसरपंच सौ. बेडगे आणि त्याचे नातेवाईक सरपंचाचा मुलगा श्री रविकांत किसन कोळेकर आणि उपसरपंच यांचा पती श्री. विलास विठ्ठल बेडगे यांनी वॉर्ड क्र ५ मधिल रस्त्याचे कामात भ्रष्टाचार केला आणि दिव्यांग निधी आणि लाभार्थी निवड प्रक्रियेत ग्रामसेवकाला हाताशी धरत २८-०२-२०१८ ते २७-०२-२०२३ पर्यंत दिव्यांग निधीत ७०,००,०००/-₹ याचा आणि रस्त्याचे कामात ३३,००,०००/-₹ आणि बोगस बोअर वेल व पाईपलाईन दाखवत २०,००,०००/-₹ चा भ्रष्टाचार केला आहे हे पुराव्या निशी दाखवत त्यांचेवर कारवाई करण्याची मागणी केली. 

हे निवेदन देते वेळी, ” महर्षि वाल्मीकी संघ (रजि.) राज्य – महाराष्ट्र या सामाजिक संघटनेचे मूळ संस्थापक अध्यक्ष – मा. श्री. रविंद्र विठ्ठल अधटराव,नुतन महाराष्ट्र राज्य कार्यकारणीचे नुतन अध्यक्ष मा. श्री. अंकुश रामचंद्र ननवरे, नुतन महाराष्ट्र राज्य कार्यकारणीचे नुतन उपाध्यक्ष मा. श्री. हेमंत नामदेव बड़े नुतन महाराष्ट्र राज्य कार्यकारणीचे सचिव मा. श्री. विजय जगन्नाथ माने, नुतन महाराष्ट्र राज्य कार्यकारणीचे खजिनदार मा. श्री नागेश मुरलीधर कोळी, सोलापूर जिल्हाध्यक्ष मा. श्री. अंकुश रामचंद्र भालेकर, जिल्हा मा. श्री. हणमंत बसवंत कोळी, द. सोलापूर तालुका अध्यक्ष मा. श्री. पंडित बाळाण्णा कोळी, आदिम बहुउद्देशीय सामनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अशोक शंकर साळुंखे, संस्थापक खजिनदार मा. श्री. गणेश गुडे, संस्थापक कार्याध्यक्ष मा.प्रा.महादेव रोकडे, महिला जिल्हाध्यक्षा मा. सौ. योगिता ताई अंकुश भालेकर आणि श्री. चंद्रकांत कोळी, श्री. संभाजी वाघळीमारे बोरगाव श्रीपूर, श्रीशैल्य कोळी, बलभीम कोळी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *