👁 11 Views

अक्षय तृतीयेनिमित्त श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरात परंपरेनुसार सुवासिनींचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

Pandharpur Live : परंपरेनुसार श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरात आज अक्षयतृतीयेनिमित्त सुवासिनींचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला.

परंपरेनुसार दुपारी श्री च्या पोशाखानंतर श्री रूक्मिणी मातेस व श्री महालक्ष्मी मातेस पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले. श्री महालक्ष्मी देवीला फराळाचे पदार्थ तयार करून ते देवीपुढं ठेवण्यात आले. श्रीविठ्ठलाची चंदनउटी पुजाही करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच महिला कर्मचाऱ्यांकडून हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला. 

यावेळी सॅनिटायझर व मास्क इत्यादींचा वापर करून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती. अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *