👁 12 Views

अजितदादा जरा सांभाळून बोला… आम्ही जर बोलायला लागलो तर तुम्हाला खूप महागात पडेल!- चंद्रकांतदादांचा अजितदादांना इशारा

 

Pandharpur Live Online : अजित दादा जरा सांभाळून बोला, आम्ही फाटके आहोत, जर बोलायला लागलो तर तुम्हाला खूप महागात पडेल. असा इशारा  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलाय .

कोल्हापूर – राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार लवकरच पडणार, असा दावा भारतीय जनता पक्षाकडून नियमीत करण्यात येतो. अनेक नेत्यांनी सरकार पडण्याचा तारखा देखील दिल्या. मात्र अद्याप सरकार सुरक्षित आहे. त्यात भर टाकत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की, महाराष्ट्र झोपेत असताना सरकार कोसळेल. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक टीका केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना गर्भीत इशारा दिला. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

महाराष्ट्र झोपेत असतानाच सरकार पडेल असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य झोपेत असताना केलं की जागं असताना असा मिश्कील प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांचा संताप झालेला पाहायला मिळाला.

पाटील म्हणाले की, ‘झोपेत कसं सरकार आणायचं हे अजित दादांनाच चांगलं माहित आहे. खुद्द शरद पवार झोपेत असताना त्यांनी सरकार आणलं होतं हे ते विसरलेत का ? ज्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही तीन दिवसांचं का होईना पण सरकार स्थापन केलंत त्यांच्यावर टीका करताना जरा तरी विचार करा’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

…………………………..

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

“पंढरपूर लाईव्ह” चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा. https://youtube.com/c/PandharpurLive

”जनसामान्यांच्या मनाचा आरसा” @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ……………………………..

अजित पवारांना थेट इशारा देत पाटील म्हणाले की, अजित दादा जरा सांभाळून बोला, आम्ही फाटके आहोत, जर बोलायला लागलो तर तुम्हाला खूप महागात पडेल. पाटील यांच्या या इशाऱ्यामुळे अजित पवार आणि चंदक्रांत पाटील यांच्यातील वाकयुद्ध पुढील काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *