👁 9 Views

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

 

पंढरपूर: प्रतिनिधी: कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंढरपूर सिंहगड अभियांञिकी महाविद्यालयात ३१ मे रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

…………………………..

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

“पंढरपूर लाईव्ह” चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

https://youtube.com/c/PandharpurLive

”जनसामान्यांच्या मनाचा आरसा” @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ……………………………..

इतिहासातील कर्तबगार स्त्रियांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव ओळखले जाते. इसवी सन १७२५ च्या सुमारास बीड जिल्ह्यातील चौंडी या गावी अहिल्याबाईंचा जन्म झाला होता. लहानपणी त्या घरीच लिहायला वाचायला शिकल्या. राज्यकारभारात फारसा रस नव्हता; म्हणून अहिल्यादेवी स्वतः दरबारात आणि जहागिरीच्या कामात लक्ष घालू लागल्या. त्यांच्या चौकस बुद्धी आणि परिपूर्ण दृष्टिकोन होता. अहिल्यादेवी धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी धर्मशाळा, तलाव, विहिरी बांधल्या. विधवा स्त्रियांना दत्तक घेण्याचा अधिकार दिला. त्या कडक करारी आणि प्रेमळ होत्या. एका हुशार, कुशल प्रशासक अहिल्यादेवीचा नावलौकिक आहे.


    या जयंतीनिमित्त महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. संपत देशमुख, प्रा. सुमित इंगोले, प्रा. अविनाश हराळे, प्रा. महेश नवले, सिद्धेश्वर लवटे, अविनाश वाघमारे, संजय बनकर, दादासाहेब बनसोडे, प्रभाकर शिंदे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *