श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर, संचलित कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षी लॉकडाउनच्या काळात मेकॅनिकल विभागा कडून ऑनलाइन माजी विद्यार्थी मेळावा
Pandharpur Live: दिनांक 27/6/2020 रोजी आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील जवळ-जवळ 120 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पांडुरंग प्रतिष्ठानचे सचिव रोहन परिचारक यांनी भूषवले. विद्यार्थी व कॉलेज यांच्या समन्वयातून भविष्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबविण्याचे त्यांनी आवाहन केले. मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक आर. जे. पांचाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व त्यांनी चित्रफितीद्वारे कॉलेज च्या प्रगतीचा आढावा घेतला. कॉलेजचे डीन आर. एन. डी. डॉ.अभय उत्पात यांनीही आपले मेळाव्या विषयी विचार मांडले. तसेच त्यांनी नॅक सायकल टू व एनबीए भविष्यामध्ये करणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर काही माजी विद्यार्थ्यांनी आपली यशोगाथा सांगितली. यामध्ये राहुल भोई हा पीएसआय म्हणून काम करत असताना पूर्व परीक्षा व मेन परीक्षा पास होताना कसा संघर्ष केला हे सांगितले. चेतन राऊत हा पुणे येथे निखिल इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मॅनेजर या पदावर काम करीत आहे. त्यानेही कॉलेज जीवनातील आपल्या आठवणी सांगितल्ल्या. तसेच कॉलेजमधील उपक्रमांचा कसा फायदा झाला हे ही सांगितले. किरण कोले हा जे.पी.जी.इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड पुणे येथे सप्लायर कॉलिटी आशूरन्स म्हणून काम करत आहे. त्यानेही कॉलेजमधील शिक्षकांनी दिलेल्या तांत्रिक ज्ञानाविषयी आभार व्यक्त केले. वैभव हिंगमिरे हा कमिन्स टेक्निकल सेंटर पुणे येथे ज्यूनियर मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. त्याला बेस्ट इंजिनियर हा अवार्ड मिळालेला आहे. त्यानेही कॉलेज विषयी ऋण व्यक्त केले. बजाज कंपनी मध्ये डिझाईन इंजिनियर या पदावर कार्यरत असलेल्या कृष्णा कामलिंगे याने आपल्या संघर्षाबाबत व कंपनी बद्दल माहिती दिली व सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. किरण जाधव हा मोहसीन लुब्रिकंटस मुंबई येथे सिनियर इंजिनीअर या पदावर कार्यरत आहे, त्याने कॉलेज मध्ये मिळालेल्या तांत्रिक ज्ञानाविषयी शिक्षकांचे आभार मानले. अशाच प्रकारे रोहित चव्हाण, मयुरेश वाघ, वैभव थोरात, सचिन पवार, प्रतीक भिंगारे, सचिन पवार यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
……………………….
ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा
“पंढरपूर लाईव्ह” चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.
https://youtube.com/c/PandharpurLive
”जनसामान्यांच्या मनाचा आरसा” @Pandharpur Live
संपर्क: Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165
Mail: livepandharpur@gmail.com
…………………………….
कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी मेळाव्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी अशीच प्रगती करत कंपनीचे व कॉलेजचे नाव उज्वल करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी विद्यार्थी व कॉलेजच्या समन्वयातून भविष्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवणार असल्याचे आश्वासन दिले. ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रमुख धनंजय शिवपुजे यांनी प्लेसमेंट संदर्भात माहिती दिली व कॉलेजचे भविष्यातील नियोजन ही सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉलेजचा विद्यार्थी प्रतिक जोशी याने केले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी कॉलेजचे प्रा. एस. एम. शिंदे व प्रा. एस. एस. गायकवाड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे वेळी कॉलेजचे रजिस्टार गणेश वाळके, उपप्राचार्य प्रा. जगदीश मुंडेगावकर सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

