👁 3 Views

*पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा उत्साहात संपन्न*

 Pandharpur live news : कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग  विभागाचा पालक मेळावा प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक ३१ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या उत्साह संपन्न झाला असल्याची माहिती प्रा. अंजली पिसे यांनी पत्रकारांना दिली.

    या मेळाव्याची सुरुवात पालक प्रतिनिधी डॉ. भाग्यश्री बोक्से, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. अंजली पिसे, प्रा. अविनाश हराळे, प्रा. अनिता शिंदे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

   या मेळाव्यात पालक प्रतिनिधी भाग्यश्री बोक्से यांचे स्वागत महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

   यावेळी उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले.

   पालक प्रतिनिधी भाग्यश्री बोक्से बोलताना म्हणाल्या, करिअरच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत कॉलेजचे योगदान अतिशय उपयुक्त ठरत असल्याचे मत बोक्से यांनी या दरम्यान बोलताना व्यक्त केले.

    उपस्थित पालकांनी यादरम्यान मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यात प्रा. अंजली पिसे यांनी विभागाचा शैक्षणिक आढावा सादर केला. यादरम्यान इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील गुणवंत विद्यार्थी व नामांकित कंपनीत प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.   

  हा मेळावा यशस्वी 

करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अनिता शिंदे यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *