👁 10 Views

महाराष्ट्रात वरूणराजाचं दमदार पुनरागमन; अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

 

Pandharpur Live Online: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे पुन्हा जोरदार आगमन  केल्याचं दिसत आहे. काल विदर्भातील काही भागांत जोरदार पाऊस कोसळा आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यासह देशात मान्सून काहीसा मंदावला आहे परंतु आता सुमारे दोन आठवड्यानंतर मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. 8 जुलै नंतर संपूर्ण देशात मान्सून पुन्हा सक्रीय होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसह देशात मान्सून वापसीचे संकेत मिळत आहेत.

पुढील काही दिवस राज्यात पावसाची स्थिती असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. गुरूवारपासून राज्यात सर्वत्र पुन्हा पावसाचा जोर वाढणार असून येत्या रविवारपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्याचे संकेतही भारतीय हवामान विभागाने दिले आहेत.

    ………………

    ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

    “पंढरपूर लाईव्ह” चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

    https://youtube.com/c/PandharpurLive

    ”जनसामान्यांच्या मनाचा आरसा” @Pandharpur Live

    संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

    Mail: livepandharpur@gmail.com

         ………………….

पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी कोसळणार असून कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केला आहे. येत्या दिवसांत राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज पुण्यासह, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. याठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

परभणी जिल्ह्यात सर्वदूर बरसला पाऊस 

बुधवारी रात्री साधारणत बारा वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाला प्रारंभ झाला. पूर्णा तालुक्यात सर्वाधिक २१ मिमी पावसाची नोंद झाली. त्याचप्रमाणे परभणी तालुक्यात १६.१, पाथरी १२.५, जिंतूर १२.४, पालम १२.५ सेलू १२.७, सोनपेठ ७.७, मानवत १०.२ आणि गंगाखेड तालुक्यामध्ये ८.१ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी १३.१ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २०१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. त्या तुलनेत २७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत १३४ टक्के पाऊस अधिक झाला आहे.

परभणी ग्रामीण मंडळात सर्वाधिक पाऊस
जिल्ह्यात बुधवारी रात्री सरासरी १३.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. परभणी ग्रामीण मंडळांमध्ये सर्वाधिक ४७.५ मिमी पाऊस झाला. त्याचप्रमाणे पाथरी तालुक्यातील कासापुरी मंडळात २८ मिमी आणि पूर्णा तालुक्यातील कावलगाव मंडळात ३८ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच इतर मंडळातही पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले आहे.

येथे होणार जोरदार पाऊस :

गुरुवार – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, नागपूर

शुक्रवार – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ

शनिवार – ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नांदेड, हिंगोली, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर

रविवार – संपूर्ण कोकण, कोल्हापूर, पुणे, सातारा, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बुलडाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर

जळगावसह पुणे, महाबळेश्‍वर, सातारा, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा, यवतमाळ येथे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान २४ ते ३९ अंश सेल्सिअस, कोकणात ३२ ते ३३ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, तर विदर्भात ३५ ते ३९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते.

मॉन्सूनला सरकण्यास पोषक स्थिती :

उत्तर भारतात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) प्रवास सुरू होणार आहे. पुढे सरकण्यास पोषक स्थिती तयार होत आहे. शनिवार (ता. १०) पासून मॉन्सूनचा वायव्य भारतातील प्रवास सुरू होणार असून, दिल्लीसह, पंजाब, हरियाना, राजस्थानच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *