👁 9 Views

महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्राला नाही – शरद पवार यांचा दावा


 
Pandharpur Live Online: केंद्रात नव्या सहकार खात्याचे पहिले मंत्री अमित शहा झाल्याबरोबर सगळ्यात तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. जयंत पाटील, अजित पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्याच्या पत्रकार परिषदेत या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


सहकार कायदे बनवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या विधानसभेने कायदे केले आहेत. विधानसभेने केलेल्या कायद्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही. केंद्र सरकार महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीवर गंडांतर आणेल या बातम्यांना फारसा अर्थ नाही,” असे शरद पवारांनी स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी हा देखील दावा केला की सहकार हा विषय घटनेनुसार राज्य सरकारचा आहे. त्यामुळे केंद्र सरकार राज्यांच्या कायद्यांच्या विरोधात कायदे करू शकत नाही.

    ……………….

    ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

    “पंढरपूर लाईव्ह” चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

    https://youtube.com/c/PandharpurLive

    ”जनसामान्यांच्या मनाचा आरसा” @Pandharpur Live

    संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

    Mail: livepandharpur@gmail.com

         ………………….

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *