Pandharpur Live Online: नाशिक शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली पंकज वीर- झनकर यांच्यासह तीन जणांना ८ लखाची लाच घेतांना पकडण्यात आले.

नाशिक शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली पंकज वीर- झनकर यांच्यासह तीन जणांना ८ लखाची लाच घेतांना पकडण्यात आले.
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. या पथकाला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहाकार्य केले. या प्रकरणात तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरिता लाच प्रकरणाती आरोपी पंकज रमेश दशपुते (राजेवाडी येथील प्राथमिक शिक्षक) यांनी आरोपी वैशाली वीर- झनकर यांचे करिता नऊ लाख रुपयाची मागणी केली.

त्यानंतर दिनांक २७ जुलै २०२१ रोजी वीर यांची पडताळणी केली असता त्यांनी सादर कामाकरिता तडजोडी अंती आठ लाख स्वीकारल्याचे मान्य करून लाचेच पुढील व्यवहार त्यांचे चालक आरोपी क्रमांक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले. सोबत करण्या बाबत सांगितले. त्यांनंतर १० ऑगस्ट रोजी येवले यांनी वीर यांचे करीत तक्रारदार यांचे कडून ८ लखा रूपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

असा होता लाचेचा यशस्वी सापळा
▶️ युनिट – ठाणे
▶️ *तक्रारदार- पुरुष वय ४५वर्षे
▶️ आरोपी- १) श्रीमती वैशाली पंकज विर, वय -४४ वर्षे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद, नाशिक.
२)ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले.शासकीय वाहक चालक.
३) पंकज रमेश दशपुते,प्राथमिक शिक्षक जि. प. शाळा राजेवाडी त.नाशिक.

▶️ *लाचेची मागणी-* ९,००,०००/- रुपये
▶️ *लाच स्विकारली* तडजोड अंती रु.८,००,०००/-
▶️ *हस्तगत रक्कम-* ८,००,०००/-रुपये.
▶️ *लाचेची मागणी -* ता.०६/०७/२०२१, २७/०७/२०२१
▶️ *लाच स्विकारली -*
दि.१०/०८/२०२१ रोजी १७:३० वा.
▶️ *लाचेचे कारण*
यातील तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २०% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबत चा कार्या देश काढून देण्याकरिता आरोपी क्र.३) यांनी आरोपी क्र.१) यांचे करिता ९,००,०००/- ₹ मागणी केली त्यांनंतर दिनांक २७/०७/२०२१ रोजी आलोसे क्रमांक 1 यांची पडताळणी केली असता त्यांनी सादर कामाकरिता तडजोडी अंती 8,00,000 स्वीकारल्याचे मान्य करून लाचेच पुढील व्यवहार त्यांचे चालक आरोपी क्रमांक 2 यांचे सोबत करण्या बाबत सांगितले त्यांनंतर दिनांक 10/8/21 रोजी आलोसे क्रमांक 2 यांनी आलोसे क्रमांक 1 यांचे करीत तक्रारदार यांचे कडून 8,00,000 रूपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले
▶️ सापळा अधिकारी- श्रीमती पल्लवी ढगे पाटील ए. सी. बी. ठाणे
▶️ सह सापळा अधिकारीी- पो नि मते
▶️ सापळा पथक
पोहवा/ मोरे ,लोटेकर पोना/ शिंदे , अश्विनी राजपूत पो शी/ सुतार चापोहवा/शिंदे
▶️ मार्गदर्शन अधिकारी – डॉ. श्री.पंजाबराव उगले सो. पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र
▶️ आलोसे यांचे सक्षम अधिकारी-
अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई
——–
अँन्टी करप्शन ब्युरो, ठाणे
दूरध्वनी क्र 27833344

……………….
Pandharpur Live Video News Updates
……………….
……………….


