👁 8 Views

नाशकात अत्याचाराची परिसीमा गाठणारी धक्कादायक घटना… भोंदूबाबाकडून बनावट पूजा मांडून 27 वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार

 Pandharpur Live Online: अत्याचाराची परिसीमा गाठणारी एक धक्कादायक घटना नाशिक येथे घडली आहे. येथील एका भोंदूबाबानं बनावट पूजा मांडून 27 वर्षीय पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भोंदूबाबानं पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्यानं पीडितेला पूजेत नग्नावस्थेत बसवून तिच्यावर अत्याचार केला आहे. हा अघोरी आणि अमानुष प्रकार समोर येताच गंगापूर पोलिसांनी भोंदूबाबासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

……………

कामील हुलाम यासीन शेख असं संशयित 29 वर्षीय भोंदूबाबाचं नाव आहे. हा भोंदूबाबा परप्रांतिय असून गंगापूर गावातील पठाडे गल्ली येथील पत्र्याच्या खोलीत राहतो. आरोपी भोंदूबाबा कामीलनं आपले दोन साथीदार स्टॅलिस्टिंग ऊर्फ शिवराम जेम्स फर्नांडिस आणि अशोक भुजबळ या दोन साथीदारांच्या मदतीनं पीडित महिलेवर अत्याचार केला आहे. आरोपीनं पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत मागील सहा ते सात महिन्यांपासून पीडितेवर अत्याचार केला आहे.

……………….

आरोपी साथीदार स्टॅलिस्टिंग ऊर्फ शिवराम जेम्स फर्नांडिस आणि अशोक भुजबळ हे पीडित महिलेच्या पतीचे ओळखीचे आहेत. या दोघांनीच पीडित महिलेशी संपर्क साधत पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवलं होतं. त्यानंतर पीडित महिलाही आरोपींच्या जाळ्यात अडकली. पैशांच्या लोभापोटी आरोपींनी सांगितलेले सर्व आघोरी कृत करायला सुरुवात केली. पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर पूजेत नग्नावस्थेत बसावं लागेल अशी अट संशयित आरोपींनी पीडित महिलेला घातली होती.

यानंतर आरोपी भोंदूबाबानं स्वत: आपल्या हातानं पीडित महिलेचं कपडे काढत तिला नग्नावस्थेत पूजेला बसवलं. यानंतर आरोपी भोंदबाबानं पीडितेवर वारंवार अत्याचार केला आहे. हा अघोरी प्रकार मागील सहा ते सात महिन्यांपासून सुरू होता. याप्रकरणी पीडित महिलेनं संबंधित आरोपींविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित दोन साथीदारांनी भोंदूबाबाला अत्याचार करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोपी पीडितेनं केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *