👁 8 Views

उच्चभ्रू कुटुंबाकडून सुनेचा शारीरिक व मानसिक छळ! 27 वर्षीय महिलेची स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद

Viral Video : पुण्य बुडालं पाप झालं लयी; जगात खरं न्हाई न वागणं बरं न्हाई! आज्जीबाईचा भन्नाट व्हिडीओ

……………..

……………..

…………………

Pandharpur Live Online: स्वारगेट जवळील मुकुंदनगर परिसरात राहणाऱ्या एका उच्चभ्रू कुटुंबावर सुनेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.

याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलगा होण्यासाठी देखील या महिलेला त्रास देण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

प्रीतम हसमुख जैन, विद्या जैन, हसमुख जैन, प्रशांत जैन (सर्व रा. पौर्णिमा टॉवर, शंकर शेठ रोड, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणी 27 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा आणि प्रीतम यांचा 2017 साली विवाह झाला. त्यानंतर पती, सासू-सासरे आणि दिर यांनी लग्नात आमचा नीट मानपान केला नाही असे म्हणुन पीडितेला सातत्याने अपमानित करून क्रूर वागणूक दिली.


तसेच त्यांना मुलगा होण्यासाठी विविध लोक जो सल्ला देतील त्याप्रमाणे वागायची धमकी दिली.
या सल्ल्याप्रमाणे न वागल्यास नवऱ्याचे दुसरे लग्न लावून देऊ अशी धमकी देखील दिली.
सातत्याने टोचून बोलणे तसेच त्यांचा मानसिक व शारीरिक छळ सुरू राहिल्याने पीडितेने यासंबंधी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक विद्या साबळे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *