👁 9 Views

संतापजनक… नगराध्यक्ष आणि स्रीरोगतज्ञ असलेल्या डॉक्‍टराची विकृती; गर्भवती महिला रूग्णाला तपासताना…

 Pandharpur Live Online: बीड जिल्ह्यातील धारूर येथे नगराध्यक्ष व स्रीरोगतज्ञ असलेल्या एका डॉक्टराची संतापजनक विकृती समोर आली आहे. गर्भवती महिला रुग्णाला तपासताना अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याबाबत संबंधित डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. स्वरूपसिंह हजारी (वय अंदाजे ६०) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. डॉ. हजारी हा धारूर नगरपालिकेत सध्या नगराध्यक्ष पदावर आहे. तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ असून धारूरमध्येच खाजगी दवाखाना चालवतो. मंगळवारी दुपारी १९ वर्षाची गर्भवती तपासणीसाठी आली होती. 

यावेळी तिला सोनोग्राफी करायची असा बहाणा दाखवत मध्ये नेले. काही वेळातच डॉक्टरने तिच्याशी लगट करत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच जातीवाचक बोलला. हा प्रकार नातेवाईकांना सांगून गर्भवती थेट धारूर ठाण्यात पोहचली. तक्रार दिल्यानंतर डॉ. हजारी विरोधात विनयभंग व ॲट्रॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे हे करीत आहेत.

डॉक्टर आणि व्यापारी असोसिएशन चा बंद

धारुर येथील डॉक्टर असोसिएशनने हा गुन्हा खोटा असल्याचे सांगत तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. आज असोसिएशन च्या सर्व डॉक्टरांनी आपले वैद्यकीय व्यवसाय बंद ठेवले असून व्यापारी असोसिएशन सुद्धा बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन गुन्हा तात्काळ गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *