👁 12 Views

महिला पोलिसाच्या प्रेमात बेफाम झाला… पत्नी आणि दोन मुलांची निर्घृणपणे हत्या! संसाराची राखरांगोळी!!


 
Pandharpur Live Online: महिला पोलिसाच्या प्रेमात बेफाम झालेल्या एका व्यक्तीने आपल्याच संसाराची राखरांगोळी करून घेतली. पत्नी आणि दोन मुलांची निर्घृणपणे हत्या करून या व्यक्तीने त्यांचे मृतदेह घरातच पुरले. दिल्ली जवळील ग्रेटर नोएडा भागात ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली असून कासगंजच्या ढोलना पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडातील चिपियाना गावात राहणाऱ्या राकेश याचे आग्रा येथे सेवेवर असणाऱ्या एका महिला पोलिसावर प्रेम जडले होते. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पत्नी आणि दोन मुलांचा राकेश याने काटा काढला. यानंतर त्यांचे मृतदेह घरातच बेसमेंटला गाडले आणि त्यावर भिंत बांधली. तसेच हत्याकांडानंतर निवृत्त पोलीस असणाऱ्या वडिलांच्या मदतीने स्वत:ला देखील मृत घोषित केले.



फेब्रुवारी 2018 मध्ये राकेशच्या सासऱ्यांनी मुलगी आणि तिचे दोन्ही मुले गायब असल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर त्यांनी जावई राकेश यानेच आपली मुलगी आणि दोन्ही मुलांचे अपहरण केल्याची तक्रार दाखल केली. याच दरम्यान, राकेशच्या निवृत्त पोलीस असणाऱ्या वडिलांनी आपल्या मुलाची हत्या झाल्याची तक्रार ढोलना पोलीस स्थानकामध्ये दाखल केली.



अखेर तीन वर्षानंतर राकेशचा मृत्यू झाला नसून तो जिवंत असल्याचे पोलीस तपासामध्ये उघड झाले. यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसी खाक्या दाखवताच राकेश पोपटासारखा बोलू लागला आणि आपणच पत्नी, दोन मुलांची हत्या करून त्यांना घरातच गाडल्याची कबुली त्याने दिली. घरात खोदकाम केल्यावर हाडे सापडली. पोलिसांनी हाडे ताब्यात घेऊन फॉरेन्सिक तपासासाठी पाठवली असून आरोपीला अटक केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *