Pandharpur Live Online: माणुसकीला काळिमा फासणारी, महाराष्ट्रा
ला हादरवणारी घटना नागपूर शहरात घडलीय. स्वतःच्याच मेहुणीचे अपहरण करून , तिला बळजबरीने दारू पाजून, सिगारेटचे चटके देऊन तिच्यावर मित्रासह एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. इतकच नाही तर तिचं अपहरण करून 3 लाखांची रक्कम मागितली. जेव्हा मेव्हणीने पैसे देण्यास नकार दिला, तर तिला सिगारेटचे चटके दिले. हि घटना नागपूर शहरातील मानकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे.
पीडित तरुणी गोधनी भागात राहते. ती ट्यूशन संपवून स्वत:च्या घरी जात असताना तिच्या मेव्हण्याने तिला पहिले व तो तिच्या जवळ गेला. तिला घाणेरडे व्हिडीओ दाखवू लागला आणि सार्वजनिक ठिकाणी घाणेरडे चाळे करू लागला. त्यावेळी मेव्हणा मंगेश याचे मित्र निलेश आणि त्याच्या मित्रांनी पीडितेचं अपहरण केलं.

यावेळी त्यांनी पीडितेचे डोळे बांधले होते. अपहरणानंतर तिला अज्ञात स्थळी नेण्यात आले त्या ठिकाणी आधीच एक मुलगी असल्याचं तिच्या लक्षात आलं. या तरुणीलाही मारहाण केली जात होती. यानंतर पीडितेलाही तिच्या मेव्हण्याने मारहाण केली. यानंतर पीडितेला जबरदस्तीने दारू पाजण्यात आली आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

पीडितेला तब्बल 2 दिवस तेथेच बांधून ठेवण्यात आले. यानंतर तिच्याकडून 3 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र पीडितेने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा तिला सिगारेटचे चटके देण्यात आले. पीडितेचे अश्लील व्हिडीओ आरोपीजवळ होते, आणि त्याच्या आधारावर तो तिला ब्लॅकमेल करीत होता. पैसे दिले नाही तर तिचे व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकीसुद्धा आरोपीने तिला दिली होती. यानंतर पीडित तरुणी कशीबशी या आरोपींच्या तावडीतून सुटली आणि थेट पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.

