👁 8 Views

संतापजनक… गावातील घरात एकटीच असल्याची संधी साधून 20 वर्षीय तरूणीवर अत्याचार; दोन नराधम गजाआड

Pandharpur Live Online: आळेफाटा (ता. जुन्नर जि. पुणे) पोलीस ठाणे हद्दीतील गावच्या घरात एकटीच असल्याची संधी साधून एका २० वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्या नराधमांना अटक केली. अशोक हरिभाऊ बनोटे व संदीप भिवसेन सूर्यवंशी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात पीडित मुलगी एकटीच घरी होती. याच संधीचा फायदा घेवून आरोपींनी घरात प्रवेश केला. घरात घुसून त्या दोघाआरोपींनी पीडित तरुणीला मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी तरुणीवर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोंपीवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अशोक हरिभाऊ बनोटे (वय- ४५, रा. श्रीरामपूर, जि अहंमदनगर) व संदीप भिवसेन सूर्यवंशी (वय- ५० रा. बोरी बुद्रुक ता. जुन्नर जि पुणे) या दोन्ही नराधमांना मोठ्या शिताफीने तात्काळ अटक केली. या दोन्ही नराधमांनी गुन्ह्याची कबुली दिली असून या घटनेमुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *