👁 11 Views

पुणे हळहळले… महिला कॉन्स्टेबलने गळफास घेऊन संपवला जीवनप्रवास; हरवली 9 महिन्यांच्या बालकाची मायेची सावली

 


Pandharpur Live 

(प्रतिनिधी  संभाजी  पुरी गोसावी)

 पुणे:  पुणे  ग्रामीण  पोलिस  दलांत  कार्यरत  असलेल्या  एका  कर्मचारी  महिलेने आपल्या  राहत्या घरी ओढणीने  गळफास  लावुन  आत्महत्या  केल्याची धक्कादायक  घटना  घडली आहे. त्या सध्या मातृत्व रजेवर होत्या. अवघ्या 9 महिन्यांच्या बालकाला सोडून त्यांचं असं जाणं पुणेकरांसाठी हळहळणारं ठरलं. 

मिळालेल्या माहितीनुसार पुजा   दत्ताञय   कांबळे  (वय  28)  रा.  तळजाई कॉलनी, प्रियदर्शनी शाळेसमोर, धनकवडी  असे  आत्महत्या  केलेल्या  माहिलेचे  नाव  आहे .  याप्रकरणी  सहकारनगर  पोलिस  ठाण्यांत  घटनेची  नोंद  करण्यांत  आली.  पोलिसांनी  दिलेल्या  माहितीनुसार  पुजा  पुणे  ग्रामीण  दलांत   पोलिस  शिपाई  होत्या  त्यांची  नेमणुक  दौड   पोलिस  ठाण्यांत  होती .  त्या  धनकवडी  येथे  पती  अणि  सासरच्या  कटुंबियासोबत  राहात   होत्या.   

दुमजली  घरात  त्यांची  खोली  दुसरया  मजल्यावर  होती.  तळमजल्यावर  इतर  कटुंबिय  राहत  होते.  त्या  गेल्या  आठ  ते  नऊ  माहिन्यापासुन  मातृत्व  रजेवर  होत्या .  रविवारी  त्यांच्या  बाळाला  नऊ  माहिने  पुर्ण  झाले  होते.  राञी  साडेदहा  वाजता  त्या  पतीला  खोलीत  जाऊन  येते  असे  सांगुन  गेल्यानंतर  बराच वेळ उलटला तरी  खाली आल्या नाहीत.  त्यामुळे   त्यांना बोलावण्यासाठी  त्यांचे  पती  वरच्या  खोलीत  गेले दरवाजा बंद असल्याने त्यांनी आवाज दिला. पूजा यांनी आतून प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी खिडकी उघडून पाहिले. आत काही दिसून आले नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी पूजा यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने पूजा यांना भारती हॉस्पिटलमध्ये नेले.परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 ही माहिती सहकारनगर पोलिसांना मिळाल्याबरोबर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आत्महत्येपुर्वी सुसाईड नोट लिहीली नसल्याचे पोलीसांनी सांगितले. परंतु, कौटुंबिक वादविवादातून हा प्रकार घडला असावा, असा संशय आहे, असे सहकारनगर पोलिसांनी सांगितले.

 त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला. सहकारनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *