पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘‘श्री’’ ची आज दि. 13 सप्टेंबर 2021 रोजीची सकाळची पुजा व आरती ‘यशश्री टेक्नोप्लास्ट’, वाखरी, पंढरपूर या यपीव्हीसी प्रोडक्शन फर्मचे संचालक श्री.अप्पासाहेब जाधव व त्यांची सुकन्या कु. श्रावणी अप्पासाहेब जाधव यांचे शुभहस्ते विधीवत संपन्न झाली.
यावेळी श्री.अप्पासाहेब जाधव यांनी पंढरपूर लाईव्हला च्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या व सर्वांच्या सुख-शांती व समृध्दीसाठी व विद्यार्थ्यांच्या यशासाठी श्रीगणेशाकडे प्रार्थना केली. विनंतीला मान देवुन उपस्थित राहिल्याबद्दल संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
लवकरात लवकर संपुर्ण जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांना सुख, शांती, समाधान व उत्तम आरोग्य लाभु दे! अशी प्रार्थनाही यावेळी श्री.अप्पासाहेब जाधव यांनी विघ्नहर्त्या गणरायाकडे केली. यावेळी पंढरपूर लाईव्ह प्रतिनिधी हर्षद कोळी आदी उपस्थित होते.





