👁 11 Views

वरातीत गाणं म्हणतानाच महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू , दुर्दैवी घटनेची दृष्य कॅमेरॅत कैद


परभणी – परभणीमध्ये लग्न सोहळ्याच्या प्रसंगी लग्नाच्या वरातीत गाणे गात असताना महिलेला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्या

ची घटना घडली आहे. हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे.



नवरदेवाची वरात लग्न मंडपातून निघाली होती, ज्यात एकीकडे बॅंड वाजत होता. वराती नाचत होते आणि याच वरातीत संगीता गव्हाणे गाणे म्हणत होत्या. गव्हाणे गाण गात असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्या खाली कोसळल्या. सगळे आनंदात असताना अचानक हा प्रसंग घडला यावेळी त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *