तळेगाव-चाकण रस्त्यावरील इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलावरून इंद्रायणी नदीपात्रात कार कोसळून अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये कारमधील एकाचा मृत्यू झाला.
संजय पुनमचंद बोरसे (43, रा. मनोहरनगर, तळेगाव स्टेशन, ता. मावळ) असे अपघातातील मृताचे नाव आहे. संजय बोरसे हे चाकणमधील एका कंपनीमध्ये कामास होते. बोरसे हे शुक्रवारी पहाटे चाकणहून तळेगावच्या दिशेने आपल्या कारने क्र. (एमएच 14 जेएम 7638) येत असताना त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार नदीपात्रात कोसळली.
दरम्यान शुक्रवारी सकाळी एक कार नदीपात्रात पडली असून मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती शुक्रवारी सकाळी पोलिसांना मिळाली. स्थानिक ग्रामस्थ, पोलिस प्रशासन आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे, गणेश निसाळ, भास्कर माळी, अविनाश कार्ले, वैभव वाघ, मयूर दाभाडे, अनिश गराडे आणि त्यांच्या सहकार्यांनी कार आणि मृतदेह सकाळी नऊच्या सुमारास नदीपात्रा बाहेर काढला. या घटनेचा अधिक तपास तळेगाव एमआयडीसी पोलिस करीत आहेत.


