👁 10 Views

Suicide : सोलापुरात मायलेकांची गळफास घेत आत्महत्या , कारण अस्पष्ट

 


सोलापूर : सोलापुरात आई (Mother) आणि मुला (Son)ने एकाच साडीने गळफास घेत  (Suicide ) केल्याची घटना सोलापुरातील शेळगी परिसरात उघडकीस आली आहे.

उमादेवी पुराणिक (62) आणि दिग्विजय पुराणिक (42) असे आत्महत्या केलेल्या मायलेकाचे नाव आहे. या दोघांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. सकाळपासून घरातून कोणतीच हालचाल किंवा आवाज येत नसल्याने शेजाऱ्यांनी घरात डोकावल्यानंतर घटना उघड झाली. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना शासकीय रुग्णालय नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत सखोल तपास जोडभावी पेठ पोलीस करत आहेत.


घरातून हालचाली होत नसल्याने शेजाऱ्यांनी डोकावून पाहिले

सोलापुरातील शेळगी परिसरात उमादेवी आणि दिग्विजय हे दोघे मायलेक राहतात. त्यांच्या घरातून सकाळपासून कोणत्याच हालचाली होत नसल्याने शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता मायलेक एकाच साडीने गळफास घेतल्याचे आढळले. शेजाऱ्यांनी तात्काळ जोडभावी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकीत याबाबत नोंद झाली आहे. दरम्यान, या मायलेकांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणावरुन केली हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस सर्व बाजूंनी अधिक चौकशी करत आहेत. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *