👁 4 Views

Juhu : ना. दा. ठा. महिला विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वृक्षारोपण

 


श्रीमती ना. दा. ठा. महिला विद्यापीठातील शासन मान्यता प्राप्त संघटना श्रीमती ना. दा. ठा. महिला विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने सन २०२२ मध्ये ” रौप्य महोत्सवी” वर्षात पदार्पण केले आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या जुहू आवारात दिनांक ०७ जून, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता संघटनेच्या कार्यालयात ” रौप्य  मोहोत्सवी वर्ष शुभारंभ” विद्यापीठाच्या  कुलगुरू, डॉ. उज्वला चक्रदेव, यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.


 त्यावेळी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू, डॉ. रुबी ओझा;  डॉ. वंदना शर्मा,  कुलसचिव (अति. कार्यभार),  श्री. राकेश वळवी, उप-कुलसचिव, विशेष निमंत्रित श्री. सुभाष दळवी, विशेष कर्तव्य अधिकारी, स्वच्छ भारत अभियान, बृहन्मुंबई महानगर पालिका, मुंबई; विद्यापीठीय अधिकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


श्रीमती ना. दा. ठा. महिला विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने रौप्य मोहोत्सवी वर्षात शुभारंभाचे औचित्य राखून “हरित विद्यापीठ” करण्याच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या “वृक्षारोपण कार्यक्रम” विद्यापीठाच्या जुहू आवारात आदरणीय कुलगुरू, डॉ. उज्वला चक्रदेव, यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. संघटनेचे माजी अध्यक्ष, श्री. प्रकाश मोरे, यांनी आव्हान केले की, वृक्षारोपण केले म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही, तर ती लावलेली रोपे जगविण्याची जबाबदारी घेणे अत्यंत महत्वाचे आहे त्या आव्हान उत्तम प्रतिसाद देत वृक्षारोपण्याच्या दिवशी विद्यापीठातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींनी रोपण केलेल्या वृक्षाचे पालकत्व स्विकारून ते जगविण्याची शपथ घेतली. 


तदनंतर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू,  डॉ. रुबी ओझा;  डॉ. वंदना शर्मा,  कुलसचिव  (अति. कार्यभार) ;  श्री. राकेश वळवी, उप-कुलसचिव; डॉ. आशिष पानट, संचालक; डॉ. संजय शेडमाके, संचालक, (अति. कार्यभार); विद्यापीठातील प्राचार्य, विभागप्रमुख, विद्यार्थिनी, निवृत्त कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. असे वृत्त शासन मान्यता प्राप्त संघटनेचे पदाधिकारी श्री. प्रभाकर पिळणकर, अध्यक्ष, श्री. चन्द्रशेखर गंधे, उपाध्यक्ष, श्री. यशवंत गावडे, महासचिव यांनी दिले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *