👁 10 Views

दहावीचा निकाल लागताच स्वेरीत डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी गर्दी



दहावीचा निकाल लागताच स्वेरीत डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी गर्दी

दि. ३० जुन पर्यंत चालणार रजिस्ट्रेशन प्रक्रिया

पंढरपूरः काल (दि.१७ जून) जाहीर झालेल्या दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने पुढील प्रवेशासाठी आणि  करिअर करण्यासाठी योग्य दिशा मिळाली. स्वेरीमध्ये प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश मिळविण्यासाठी दि. ०२ जून पासून  असलेल्या गर्दीत आज अधिक भर पडली असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

        गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.६४३७) ला मान्यता मिळाली आहे. दि.०२ जून २०२२ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी संबंधित प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया गुरुवार, दि. ३० जून २०२२ पर्यंत चालणार आहे. प्रवेश केंद्रावर अधिक गर्दी होऊ नये या हेतूने दहावीच्या निकालापूर्वीच डिप्लोमा प्रवेशाची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यासाठी विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेचा आसन क्रमांक टाकून प्रवेश अर्ज भरता येत होता. त्यात काल गुणपत्रिका देखील ऑनलाईन मिळाल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. 



सन २०२२-२३ करीता डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रे, कागदपत्रांची तपासणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांनी अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.-६४३७) म्हणून स्वेरी पॉलिटेक्निकला मान्यता दिली आहे. ‘पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणाऱ्या अडचणी व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले असून यंदाचे स्वेरी डिप्लोमा इंजिनिअरिंगचे १५ वे वर्ष असून या  महाविद्यालयाने स्थापनेपासूनच उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने सर्वोत्कृष्ट निकाल, आदर युक्त शिस्त आणि करिअरच्या दृष्टीने सर्वोत्तम संस्कार देण्याची परंपरा कायम राखल्यामुळे स्वेरीच्या ‘पंढरपूर पॅटर्न’ चा दबदबा कायम आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ५ अभ्यासक्रमांना मिळालेले एनबीए मानांकन, महाराष्ट्र व गोवा राज्यातील बेस्ट पॉलिटेक्निक कॅम्पस अवॉर्ड, गेली सलग पाच वर्षे शंभर टक्के ऍडमिशन होणारे महाराष्ट्रातील एकमेव खाजगी महाविद्यालय आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या पसंतीस उतरलेले स्वेरी अभियांत्रिकी हे राज्यात ‘ब्रँड’ बनले आहे. त्यामुळे स्वेरीत प्रवेशासाठी प्रचंड गर्दी होत आहे. रजिस्ट्रेशनची ही प्रकिया दि.३० जून २०२२ (सायं ५:००) पर्यंत चालणार आहे. याचा लाभ दहावी मधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घ्यावा.’ असे आवाहन देखील प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ यांनी केले आहे. या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर दि.०३ जुलै २०२२ रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा.एस.एस. गायकवाड (मोबा.क्र. ९८९०५६६२८१) व प्रा. एम. एम. मोरे (९४२१९६०२५८) यांच्याशी  संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सन २०२२-२३ करीता प्रवेशासाठी स्वेरी संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *