👁 8 Views

स्वेरी एमबीएच्या दिगंबर ताड यांची ‘लीडरशिप बौलवर्ड प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत निवड



स्वेरी एमबीएच्या दिगंबर ताड यांची ‘लीडरशिप बौलवर्ड प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत निवड

पंढरपूरः ‘लीडरशिप बौलवर्ड प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या निवड प्रक्रियेतून श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एमबीए या अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या दिगंबर दत्तात्रय ताड यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

      ‘लीडरशिप बौलवर्ड प्रायव्हेट लिमिटेड’ (लीड स्कूल) या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या एमबीए विभागातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून अंतिम वर्षात शिकत असलेल्या दिगंबर ताड या विद्यार्थ्याची त्यांनी निवड केली. श्री.विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतात आणि पात्र विद्यार्थ्यांची निवड करत असतात. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात? याचा सखोल अभ्यास करून कंपन्यांच्या मागणीनुसार संबधित विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून व कुशल प्रशिक्षकांद्वारे एप्टीट्युड, कम्युनिकेशन स्कील, टेक्निकल स्कील, विविध सॉफ्टवेअर्स, मॉक इंटरव्युव्ह यांचे प्रशिक्षण दिले जाते. स्वेरीमध्ये वार्षिक परीक्षांचे उत्कृष्ट निकाल, संशोधने, मानांकने, इन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्लेसमेंटकडे देखील अधिक लक्ष दिले जाते. कॅम्पस प्लेसमेंटद्वारे मागील वर्षी कोरोनाचा प्रभाव असताना देखील तब्बल ५९५ पेक्षा अधिक नोकरीच्या संधी महाविद्यालयाकडून प्राप्त करून देण्यात आल्या. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.



 एकीकडे स्वेरीने प्रवेश प्रक्रियेत व वार्षिक परीक्षेच्या निकालात मारलेली गरुडझेप दिसून येते तर दुसरीकडे स्वेरी अभियांत्रिकीला देशातील शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण असलेले ‘नॅक’ अर्थात ‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिल’चे ३.४६ सीजीपीए सह ‘ए प्लस’ हे मानांकन मिळाले आहे. ए.आय.सी.टी.ई (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) व यु.जी.सी. (युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशन) यांच्याशी संलग्नित असणारे व ३.४६ सीजीपीए सह नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन मिळविणारे स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे सोलापूर विद्यापीठातील पहिले व एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे. या विद्यार्थ्याला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या दिगंबर ताड यांचे अभिनंदन केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *