👁 4 Views

कर्मयोगी इन्स्टिट्यूट च्या चार विद्यार्थ्यांची निवड : कर्मयोगीचे प्लेसमेंट मधील सातत्य कायम


श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग  विभागातील अंतिम वर्षा मधील चार विद्यार्थ्यांची मेटा इंगिटेक या नामांकित कंपनी मध्ये निवड झाली असून त्यांना वार्षिक 3.36 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. 

पुणे येथील  मेटा इंगिटेक या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग  विभागातील अंतिम वर्षामध्ये शिकत असणाऱ्या  अजित शिंदे, आनंद साळुंखे, विकास पवार, आकाश शिंदे या विद्यार्थ्याची निवड केली आहे. दर वर्षी प्रमाणेच शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही कर्मयोगीने प्लेसमेंट क्षेत्रामद्धे आपले सातत्य कायम ठेवले आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होण्याधीच च विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड होताना दिसून येत आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत दिले जाणारे प्रशिक्षण हे कार्पोरेट क्षेत्रात नोकरी लागण्यासाठी अतिशय पूरक व उपयोगी होत आहे असे निवड झालेल्या विद्यार्थी आवर्जून सांगतात. शेवटच्या वर्षामध्ये असताना च विद्यार्थ्यांना गलेल्लठ पगाराची नोकरी मिळत असल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. 

श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी,  विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने व इतर सर्व प्राध्यापक यांनी गणेश मोरेचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *