👁 12 Views

सिंहगडच्या पुनम सावंतची ३ मल्टिनॅशनल कंपनीत निवड*

 


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या जित्ती (ता. मंगळवेढा) येथील कुमारी पुनम विलास सावंत हिची ३ वेगवेगळ्या मल्टिनॅशनल कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.


     कोर्टी येथील सिंहगड काॅलेज मधील अनेक विद्यार्थ्यांनी विविध नामांकित कंपनीत निवडले जात आहेत. काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेली कुमारी पुनम विलास सावंत हिची पुणे येथील “वाॅल्टर्स क्युवर” कंपनीत निवड झाली असुन वार्षिक पॅकेज ३ लाख मिळाले आहे. इनोव्हल डिजिटल सोल्युशन्स प्रा. लि. कंपनीत तसेच क्वालिटी किस्को टेक्नॉलॉजीज कंपनीत कडून वार्षिक ३.५० लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे. अशा तीन कंपनीत पुनम सावंत हिने कॅम्पस मुलाखती दिल्या होत्या.

     सिंहगड कॉलेज मध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस मुलाखतीतून कुमारी पुनम सावंत हिची तिन्ही कंपनीत निवड झाली असुन पुनम सावंत हि “वाॅल्टर्स क्युवर” कंपनीत रूजू झाली असुन कंपनीकडून तिला वार्षिक ३ लाख रूपये पगार मिळणार आहे. “वाॅल्टर्स क्युवर” कंपनी वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, वकील आणि कर, वित्त, ऑडिट, जोखीम, अनुपालन तसेच नियामक क्षेञांसाठी व्यवसायिक माहिती, साॅफ्टवेअर सोल्युशन्स इत्यादी क्षेत्रात सेवा देणारे जागतिक प्रदाता आहे.


   विविध नामांकित कंपनीत निवड झालेल्या कुमारी पुनम विलास सावंत हिचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *