👁 7 Views

पंढरपूर लाईव्ह च्या न्युज स्टुडिओतील अनंत चतुर्दशी रोजी ‘श्री’ ची दुपारची पुजा व आरती पंढरपूर नगरपरिषदेच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न

 


पंढरपूर लाईव्ह: सालाबादप्रमाणे या वर्षीही पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.  असून पंढरीच्या विविध क्षेत्रातील गुणीजण मान्यवरांच्या शुभहस्ते विघ्नहर्त्याची पुजा व आरती करण्यात येत आहे.

आज पंढरपूर लाईव्ह च्या नव्या स्टुडिओतील श्रीगणेशाची सकाळची पुजा व आरती पंढरपूर नगरपरिषदेच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.


यावेळी सर्वांच्या सुख, शांती, समृध्दी व उत्तम आरोग्यासाठी सौ.साधनाताई भोसले यांनी विघ्नहर्ता गणरायाकडे प्रार्थना केली. तसेच पंढरपूर लाईव्ह व बातमी २४ तास च्या कार्याचं कौतुक करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल मुख्य संपादक भगवान वानखेडे व सहसंपादक विकी साठे यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी वृत्तनिवेदिका  सौ.निकीता साठे यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.

यावेळी कु. श्वेता भोसले, डॉ.दादासाहेब नागणे आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *