पुणे-सोलापूर महामार्गावर अमरबाग परिसरात टँकर पलटी होऊन भीषण अपघात झाला. अपघातामध्ये एकजण जागीच ठार झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत. आज पाहटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने अँश घेऊन टँकर भरधाव वेगाने येत होता. आकाशवाणी केंद्राजवळील रविदर्शन चौक ओलांडून हा टँकर अमरबाग सोसायटीसमोर आला असता समोरून उलट दिशेने येणाऱ्या दुचाकीला वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नात चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने टँकर एका कारसह तीन रिक्षांना धडक पुढे गेला. त्यानंतर टँकर रस्त्याशेजारील झाडावर जोरदार धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की हे झाडही या धडकेत तुटून एका रिक्षावर पडले आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, महामार्गावर सुमारे दोन किलोमीटर वाहतूक कोंडी झाली होती.
घटनास्थळी पोलिस, अग्निशामक दलाचे कर्मचारी, जीवरक्षक बच्चूसिंग टाक, प्रशांत सुरसे, सुनील बनकर यांच्यासह आसपासच्या नागरिकांनी बचाव कार्य केले. क्रेनच्या साह्याने कंटेनर बाजूला हटविले आहे. जखमींना खाजगी रुगालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

.jpg)