👁 7 Views

दारुसाठी मुलानेच केला आईला ठार मारण्याचा प्रयत्न

 अभिजीत गोपीचंद दरेकर (वय 32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे याप्रकरणी त्याची आई सिंधू गोपीचंद दरेकर (वय 50) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी सायंकाळी हा सर्व प्रकार घडला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिजीत याला प्रचंड दारू पिण्याचे व्यसन होते. काहीही कामधंदा न करता तो सतत दारू प्यायचा. बुधवारी सायंकाळी तो घरी आला यावेळी घरात आई आणि त्याची पत्नी होती. यावेळी त्यांनी पत्नी मनीषा तिला शिवीगाळ केली आणि चाकू घेऊन थेट आईच्या डोक्यात वार केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *