👁 4 Views

भल्यामोठ्या सापाने अडवला रस्ता, पठ्ठ्याने सापच हाताने उचलून बाजूला फेटकला

 सापाशी बेजबाबदारपणे वर्तन करणे किती भयानक आणि तितकेच जीवघेणे असू शकते, हे तर आपण जाणताच. तरीही लोक असे वर्तन करतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल  झाला आहे.


या व्हिडिओत दिसते की एक भलामोठा साप कदाचित त्याला छोटा अजगरही म्हणता येईल एका पठ्ठ्याने हाताने उचलून बाजूला ठेवला. रस्त्यावर घडलेली ही घटना अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली आहे.

भारतीय वन सेवा अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ धक्कादायक आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक माणूस रस्त्याच्या मधोमध विसावलेल्या एका मोठ्या सापाजवळ येतो. मग हा माणूस तो सरपटणारा प्राणी त्याच्या हातांनी उचलतो आणि त्याला बाजूला करतो. भलामोठा साप मग अंधारात नाहीसा होतो.


आयएफएस अधिकारी अधिकारी परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटरवर केलेल्या या व्हिडिओच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, वन्यप्राण्यांच्या अधिवासात जाणे आणि त्यांना त्रास देणे किंवा रस्ता अपघातापासून वाचवणे, हे सर्वच धक्कादायक आहे. 

व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. काहींनी नागाला रस्त्यावरून हटवल्याबद्दल त्या माणसाचे कौतुक केले आहे. तर काहींनी वन अधिकाऱ्यांना न कळवता वन्यप्राण्यांना त्रास दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *