👁 7 Views

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

पंढरपूर: प्रतिनिधी

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात रविवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्ञी यांची जयंती साजरी करण्यात आली.

महात्मा गांधी व लालबहादूर शास्ञी यांच्या प्रतिमेचा पुजन काॅलेजचे उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. चेतन पिसे, डॉ. संपत देशमुख, प्रा. अनिल निकम आदीच्या हस्ते दिपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.


  या कार्यक्रमास डाॅ. शिरीष कुलकर्णी, प्रा. अनिल निकम, प्रा. उमेश घोलप, प्रा. यशवंत पवार, प्रा. समाधान माळी, प्रा. बागल, सिद्धेश्वर लवटे, एकनाथ इंगवले, राजाराम राऊत, पांडूरंग परचंडे, दत्तात्रय नवले, श्रीपाद घोंगडे, वैभव गायकवाड आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *