👁 6 Views

मोठी दुर्घटना …. दुर्गापूजा मंडपाला भीषण आग …६४ जण होरपळले

 उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात रविवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. दुर्गापूजा मंडपात भीषण आग लागली. यामध्ये एका लहान मुलाचा आणि एका महिलेचा मृत्यू झाला तर 64 जण जाळले आहे.


यातील गंभीर भाजलेल्या 42 जणांना वाराणसीत दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत. सुमारे अर्ध्या तासानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा संशय आहे. एडीजी राम कुमार यांनी अपघाताच्या चौकशीसाठी 4 सदस्यीय एसआयटी स्थापन केली आहे.


औरई येथील नर्थुआ गावातील पूजा मंडपामध्ये रात्री नऊच्या सुमारास आरती होत होती. त्यानंतर अचानक आग लागली. संपूर्ण मंडप आगीच्या भक्ष्यस्थानी आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मिर्झापूर येथून अग्निशमन दलाच्या गाड्याही मागवण्यात आल्या होत्या. डीएम गौरांग राठी यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे, वाराणसीचे पोलीस आयुक्त ए सतीश गणेश यांनी सांगितले की, जळालेल्या लोकांना ग्रीन कॉरिडॉर बनवून बीएचयू ट्रॉमा सेंटरमध्ये आणण्यात आले. या संपूर्ण प्रकरणावर ते स्वत: लक्ष ठेवून आहेत. दुर्गा पंडालला लागलेल्या आगीच्या घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. अपघातात जखमी झालेल्या सर्वांवर योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *