👁 10 Views

१४ लाखांचा गुटखा जप्त

 न्न व औषध प्रशासनाने गुटखा, पानमसाला, सुंगधित तंबाखु विरोधात चार-पाच महिन्यांपासून सुरु केलेल्या कारवाईतंर्गत राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचा १४ लाखापेक्षा अधिक रकमेचा साठा जप्त करण्यात आला.


नाशिकरोड येथे साठवणूक केलेले गोदाम बंद करण्यात आले असून नाशिकरोड पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरुध्द दाखल करण्यात आला आहे.


राज्यात प्रतिबंधित असलेला साठा आणि वैधानिक इशारा नसलेल्या सिगारेटचा साठा नाशिकरोड परिसरातील गोदामात करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. रविवारी सायंकाळी उशीराने विभागाने शिंदेगाव परिसरात कारवाई करत गोदामातील १४ लाख, ७५ हजार ४७४ रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. पोलिसांनी सोनू लोहिया, रामविलास लोहिया, मनोज लोहिया, राम लोहिया यांच्याविरूध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून गोदाम बंद करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *