👁 11 Views

सोलापूर; जन्मदातीवर मुलाचा चाकू हल्ला, आईची मृत्यूशी झुंज

 साेलापूर शहरातील एका मुलानं आपल्या आईवर  जीवघेणा हल्ला केला.

हल्ल्यानंतर नातेवाईकांनी संबंधित महिलेस तातडीने रुग्णालयात  दाखल केले. मृत्यूशी झुंज देणा-या महिलेचा मूलगा हा मनाेरुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे


लॉकडाऊनचा फटका अनेकांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे सोलापूर शहरातील इंजिनिअर असलेला सुफीयान शेख हा मानसिक रोगी झाला होता. 


आज (बुधवार) सकाळी त्याने जन्मदाती आई जरीना अस्लम शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. घरात ठेवलेल्या चाकुने तब्बल तीन वार करत त्याने आईला भोकसलं. नातेवाईकांनी ताबडतोब जखमी जरीना यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेे. जरीना या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे



Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *